महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ शाखा-पाचोरा तर्फ़े सत्कार
पाचोरा – गटसाधन केंद्र पाचोरा येथे आयोजित सत्कार समारंभात महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ शाखा-पाचोरा च्या वतीने पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तात्यासाहेब मा. विकास पाटील,विस्तार अधिकारी आण्णासो मा.समाधान पाटील शा.पो.आ. अधीक्षिका मा.सरोज गायकवाड मॅडम, केंद्रप्रमुख दादासो मा आर.डी. पाटील यांचा पंचायत राज समिती यांनी उत्कृष्ट कामगिरी व सादरीकरणाबद्दल अभिनंदनाचा ठराव करून कौतुक केल्याबद्दल महासंघाच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमात श्री.सु.ना.पाटील सर,श्री. समाधान पाटील साहेब,श्री.विकास पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सदर कार्यक्रमात श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर यांचे मा. गटशिक्षणाधिकारी व महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री.सु.ना. पाटील सर,मुख्याध्यापक श्री. शशिकांत महालपुरे सर,मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर मुख्याध्यापिका श्रीमती.प्रतिभा पाटील मॅडम,मुख्याध्यापक श्री.समाधान महाजन सर,मुख्याध्यापक श्री.अनिल पाटील सर,महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री.राकेश पाटील सर,सचिव श्री.बाळू पवार सर सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्वश्री गुलाबराव महाजन,शांताराम पाटील ,संदीप शेवरे,अशोक वानखेडे मनोज पवार,महेश पाटील,संदीप वाघ,स्वप्नील माने,अविनाश पाटील,मगर सर,वानखेडे सर,कुंभार सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार श्री.बाळू पवार सर यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377