आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय

पाचोऱ्यात महाविकास आघाडीच्या बंदला यांनी फासले हरताळ

पाचोरा-संपुर्ण महाराष्ट्र बंद पुकारला असताना शिवाय अत्यावश्यक सेवेत मोडत नसताना, भडगाव रोड रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील पाचोरा नगरपालिकेच्या जागेचा फुकटात वापर करीत असताना अतिक्रमीत जागेवर मागील अनेक वर्षांपासून दुकान थाटून बसलेले हे दोघांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या बंदला दुकाने उघडे ठेवून हरताळ फासून  बंदचा विरोध नोंदवला आहे आणी एक प्रकारे खुले आव्हानच जणु सत्ताधारिना देऊन टाकले आहे.यांचेवर कोण कारवाई करणार हा विषय परिसरात दबक्या आवाजात चर्चिला जात आहे

.

click on icon to see news बातमी बघण्या साठी क्लिक करा

केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडणा-या प्रकाराचा निषेध करीत झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग यावी म्हणून महाविकास आघाडी ने बंद च्या घोषणेत पाचोरा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

शेतकरी विरोधी तिन काळे कायदे रद्द करा यामागणीसाठी मागिल तिनशे दिवसा पासुन दिल्ली च्या सिमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पंतप्रधान मोदींनी ठेंगा दाखविला आहे त्यातच रहीमपुरखेरी या गावातील शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असतांना त्यांना केंद्रीय मंत्रीच्या मुलाने स्वतः च्या गाडी खाली चिरडले यात एक पत्रकार देखिल शहीद झाला आहे. शहीद शेतकर्‍यांच्या परीवाराला सांत्वन भेट द्यायला जातांना कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज दि. ११ अॉक्टोंबर रोजी महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद चे आवाहन केले असता पाचोरा शहरातील व्यापारी वर्गाने बंद मध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव,  शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर खान, कॉग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी. पाटील, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अॅड वसीम बागवान,नाना पाटील, भुषण पाटील, शरीफ खाटीक, गणेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे  बशिर बागवान,  नितीन तावडे, रणजित पाटील, सत्तार पिंजारी, गौरव वाघ, उमेश एरंडे, हेंमत पाटील, अॅड. अविनाश सुतार,  गोपी पाटील, सलिम शाह, खलील देशमुख, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भोला चौधरी, संजय पाटील, विनोद पाटील, हरुन देशमुख, भगवान मिस्तरी, अरुण पाटील, प्रकाश भोसले, शिवसेनेचे शिवसेना गणेश पाटील, पप्पू राजपुत, प्रवीण ब्राम्हणे, अनिल सांवत, आंनद पगारे, आदी उपस्थित होते. बंद दरम्यान आ.किशोरअप्पा पाटील, डीवायएसपी काकडे, पो. निरीक्षक नजनपाटील, पी. एस. आय. विकास पाटील, यांनी भेट दिली

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\