आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांचे स्मारक व्हावे – विधानपरिषदेत सदस्यांची मागणी

मुंबई, दि. 28 : विधिमंडळातील ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांचे स्मरण नव्या पिढीला होत राहावे. यासाठी विधान भवन परिसरात त्यांचा पुतळा उभारावा, अशी भावना विधानपरिषदेत सदस्यांनी व्यक्त केली.

दिवंगत गणपतराव देशमुख हे दोन्ही सभागृहाचे गुरुजी होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख करुन देणारे स्मारक व्हावे. यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.

याबाबत सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापतींच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करुन यात सर्वपक्षीय आमदारांचा समावेश करण्यात यावा. गणपतराव देशमुख यांच्या स्मृतींचे जतन करण्यासंदर्भात विचारविनिमय करुन निर्णय घेतला जावा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.

औचित्याच्या मुद्दाच्या अंतर्गत सदस्य जयंत पाटील यांनी हा विषय उपस्थित केला होता

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!