सिंधुदुर्गनगरी दि. 26 -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ओरोस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलीसाने केले.त्यामुळे त्या भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी. राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377
.