शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या शंभर टक्के निकालाची हॅट ट्रिक
पाचोरा, दि 23 – गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा दहावी सी बी एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या बोर्ड परीक्षेत शिंदे स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. एकूण 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
सात विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. त्यापैकी
प्रथम क्रमांक- किर्तिराज नंदलाल देशमुख 97%,
द्वितीय क्रमांक- तन्मय नितीन पाटील 93.2%,
द्वितीय क्रमांक- वेदांत भानुदास पाटे 93.2%
तृतीय क्रमांक- प्रेरणा मनिष अग्रवाल 92.8%
चतुर्थ क्रमांक- नंदिनी भगवान बडगुजर 92.2% गुण प्राप्त करून यश संपादन केले.
निकालाचे विशेष म्हणजे ,विविध विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवणारे विद्यार्थी देखील आहेत. जसे कीर्ती राज देशमुख IT -100, English-99, वेदांत पाटील social studies 100 .उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत गुण प्राप्त करून शाळेचे व पाचोरा शहराच्या नावलौकिकात भर टाकली आहे.
संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सेक्रेटरी ऍड. जे.डी. काटकर सर, उपाध्यक्ष नीरज मुनोत सर , सह सचिव शिवाजी शिंदे सर पाचोरा शहराचे तरुण युवा नेते*₹ अमोल भाऊ शिंदे, सौ पूजा ताई शिंदे ,शाळेचे प्राचार्य डॉक्टर विजय गोरख पाटील सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले
तसेच शिक्षक वृंदांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची शिदोरी पोहोचवण्याचे काम चोखपणे केले यामुळे संचालक मंडळाने व प्राचार्य सरांनी शिक्षकांचे देखील कौतुक केले. व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377