आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि.16 : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. फॅबिग यांच्यादरम्यान यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. जर्मनीमधील उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, राज्य शासनामार्फत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

येत्या सहा महिन्यांत जर्मनीतील उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्राला भेट देणार आहेत. या शिष्टमंडळाला राज्याच्या वतीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. फॅबिग यांनी व्यक्त केली. त्यांचे राज्यात स्वागतच होईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आश्वस्त केले.

.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!