पाचोरा येथील गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनींना शारीरिक बदला विषयी महिला स्त्रीरोग तज्ञांकडून मार्गदर्शन

पाचोरा– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे विद्यार्थिनींसाठी त्यांच्या संबंधित असलेल्या वैद्यकीय समस्या व वयोमानानुसार शरीरात होणारे बदल या संदर्भात चर्चासत्र सह मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गो से हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ मॅडम उपस्थित होत्या तर मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ञ. डॉ. पिंजारी बालरोग तज्ञ डॉक्टर प्रीतीताई मगर उपस्थित होते त्याच्यासमवेत व्यासपिठावर जेष्ठ शिक्षिका संगिता वाघ मॅडम,प्रतिभा मॅडम व वैशाली कुमावत उपस्थित होत्या
याप्रसंगी विद्यार्थिनींची हितगुज साधत गुड टच ,बॅड टच यासह वयोमानानुसार विद्यार्थिनींचे होणारे शारीरिक बदल व निसंकोचपणे आपले आई सह घरातील ज्येष्ठ महिला सदस्य याशिवाय शाळेतील शिक्षिका यांच्याशी हितगुज करणे व योग्य ती वेळोवेळी काळजी घेणे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात विचारलेल्या शंका व प्रश्नांसंदर्भात उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थिनींना समर्पक अशी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक अंजली गोहिल मॅडम यांनी केले तर आभार शितल मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांत आपल्या घरी सांगितल्यानंतर पालकांनी स्वतःहून शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधून अशा प्रकारच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले व शिक्षणासोबतही शाळेत असे उपक्रम राबविण्यात यावे जेणेकरून जे आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आम्ही सांगू शकत नाही ते तुमच्या स्तरावर तुम्ही सहज सांगू शकतात असेही मत व्यक्त केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



