पाचोरा शिवसेना (उबाठा) तर्फे कोषारींचा जाहीर निषेध करीत प्रांतांना निवेदन सादर.
पाचोरा – राज्यपाल भगसिंग कोषारींचा जाहीर निषेध म्हणून तसेच भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांचा जाहीर निषेध म्हणून शिवसेनेच्या (उबाठा)नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले तसेच पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी प्रतिपादन केले राज्यपाल भगतसिंग कोषारी वारंवार चुकीचे वक्तव्य करत आहे व त्यांच्या पक्षांना मोठे करण्यासाठी कोणाची तुलना कोणाशी करावी याचे सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही या गोष्टीचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी युवासेना सर्वे पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते तसेच संभाजी ब्रिगेड निषेध जाहीर करत आहोत
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख अभय पाटील पाचोरा शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील रमेशचंद्रजी बाफना भरत खंडेलवाल पाचोरा मा. नगरसेवक दादाभाऊ चौधरी दत्ता भाऊ जडे युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन ,युवासेना पाचोरा तालुका प्रमुख भूपेश सोमवंशी युवा सेना शहर प्रमुख हरीश देवरे संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख प्रवीण पाटील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेध नोंदवण्यासाठी पाचोरा येथे उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377