क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती माळी समाज मंडळ ,भडगाव रोड पाचोरा यांच्या वतीने उत्साहात साजरी.

पाचोरा:- स्त्री शिक्षणाचे प्रणेत्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जयंती निमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण कार्यक्रम एन.बी. महाजन सर यांच्या निवासस्थानी भवरलाल नगर पुनगाव रोड, पाचोरा जि.जळगाव येथे माळी समाज मंडळ भडगाव रोड – पाचोरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेली समाज पंच मंडळाचे सचिव पत्रकार शांताराम चौधरी सर हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर.जी.सावंत सर,सुनिल महाजन सर, डॉ.संजय माळी यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर कु.अंकिता अशोक माळी या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यींनीने भाषणातून सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करून देवून उपस्थितांची दाद मिळवली.या कार्यक्रमाचे आयोजक शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांनी या महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक पोवाडा सादर केला. यावेळी भडगाव रोड पाचोरा परिसरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व अभ्यासिका उभारण्याचा मनोदय ऐतिहासिक निर्णय घेऊन शाहीर विठ्ठल महाजन यांनी मनोगतातून व्यक्त केला.या ऐतिहासिक निर्णयाला उपस्थितांनी रजिस्टर वरती सह्या करून विषयाला सहमती दर्शवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शांताराम चौधरी सर यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुलेंच्या जिवन चरीत्र मांडुन मनोगत सादर केले. सुत्रसंचलन तावरे माध्यमिकचे श्री.गुलाबराव महाजन सर व आभार एन.बी.महाजन सर यांनी मानले.
याप्रसंगी बहुजन समाजातील राजेंद्र बोरसे. श्री.चिंतामण जाधव, दिपक शेवरे,हभप श्रीराम बापू पाटील,संतोष महाजन सर,सुनिल उमाळे,पंकज पाटील, विकास महाजन,गुलाब माळी, राकेश महाजन,आर्यन पाटील महिला वर्ग प्रतिभा नागराज महाजन,वैशाली संतोष महाजन, अर्चना सुनिल उमाळे, इत्यादी बहुजन समाज व माळी समाज बंधु भगिनी उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



