औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआय चा पुरस्कार प्रदान.
ठाणे – येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री आदरणीय श्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआयचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस सर्वोत्कृष्ट आयटीआयचा पुरस्कार रुपये पाच लाख,प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव माननीय श्री आशिष कुमार सिंह आयुक्त आयुक्त एन रामास्वामी तसेच य्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे संचालक मा.श्री दिगंबर दळवी साहेब, सहसंचालक श्री पी एम वाकडे साहेब उपस्थित होते संस्थेच्या वतीने हा पुरस्कार पाचोरा येथील रहिवासी प्राध्यापक मनीष बाविस्कर यांचे लहान बंधू व देशमुखवाडी परिसरातील यादव परिवाराचे जावई तथा संस्थेचे प्राचार्य श्री दीपक बाविस्कर,संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा व वरिष्ठ निदेशक श्री संजय मस्के यांनी स्वीकारला.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377