आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

कृषी विस्तार सेवांमध्ये पदविका प्राप्त करण्याची संधी

जळगाव – जिल्ह्यातील परवानाधारक कृषिनिविष्ठा विक्रेते तसेच बिगर परवानाधारक व्यक्तींसाठी कृषी विस्तार सेवांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

या पदविका अभ्यासक्रमाचे नाव Diploma in Agricultural Extension Services for Input Dealers (DAESI) असे आहे‌. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०१७-१८ पासून नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्युट मार्फत करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सदर अभ्यासक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रशिक्षणार्थी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून परवानाधारक, बिगर परवानाधारक, कृषी व्यवसाय करणाऱ्या कंपन्या किंवा कृषी सहकारी संस्था आदींनी प्रायोजीत केलेले प्रशिक्षणार्थी यांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, खत परवाना छायांकीत प्रत, २ पासपोर्ट साईज छायाचित्र इ. आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प संचालक, (आत्मा), जळगाव कार्यालय, प्लॉट नं.१०, पुष्कराज बिल्डींग, दिक्षीत वाडी येथे संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी देविदास पितांबर कोल्हे (लेखा-नि-लिपीक तथा सहाय्यक अधीक्षक, आत्मा, जळगाव) यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9325390545 / 9423574803 वर संपर्क साधावा. असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!