आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
ताज्या बातम्याराजकीय

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रांताधिकारी कार्यालयास विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर

पाचोरा :- पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात निवेदन सादर करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून निवेदन देण्यात आले

कोरोना महामारीमुळे अनेक समस्या उदभवल्या आहेत साथीवर नियंत्रण मिळवने कठिण झाले असून,बेरोजगारी व महागाई वाढली आहे असे असताना केंद्र सरकार इंधन दरवाढ असो की दैनदिन जिवनातील अत्यावश्यक वस्तु यांचे भाववाढ नियंत्रित करू शकली नाही.तसेच अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत जीवन-मरणाशी संबंधित मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासनास निवेदन सुपूर्त केले गेले

जनतेच्या यातील प्रमुख मागण्या

1) डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. तरी सर्व प्रकारच्या इंधनाचे भाव त्वरित कमी करण्यात यावे.

2) खरीप पिकांच्या पेरणीच्या सध्याच्या काळात शेतकऱ्यांना बी – बियाणे, खते, कीटकनाशक खूपच महागड्या दरात खरेदी करावे लागत आहेत. तसेच खरेदीदार शेतकऱ्यांना नोंदणी, आधार कार्ड वगैरे पुराव्यांच्या नको त्या जाचक अटी लागू केल्या आहेत. एक प्रकारे सर्व प्रामाणिक शेतकऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहण्याचा हा कार्यक्रम राबवला जात आहे. तरी शेतकऱ्यांशी सुरू असलेली ही त्रासदायक वर्तणूक बंद करावी व गरजेनुसार बी – बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा करावा. आणि या सर्व वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे.

३) महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीला अतिशय विकृत स्वरूप देऊन जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध मराठा” असा नवा वाद निर्माण करण्याचे उद्योग केंद्र सरकारच्या यंत्रणेने सुरू केले आहेत. त्या निरर्थक पण समाजात आणि जाती – जातीत संघर्ष निर्माण करणाऱ्या उपद्व्यापाना पायबंद घालण्यात यावा आणि सकल मराठा समाजाच्या मागण्या कोणत्याही अन्य समाजघटकांना धक्का न लागू देता मान्य करणाऱ्या भूमिकेला केंद्राने पाठिंबा द्यावा.

४) कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला लसीकरणासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविडसारख्या जीवन-मरणाशी  संबंधित कठीण महामारीचे निर्मूलनाच्या नियोजनात भाजपा विरोधी राज्यांशी दुजाभाव केला जात आहे. तो त्वरित  थांबवावा आणि कोविड प्रतिबंधक लस सर्वत्र तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.

यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,संजय नाना वाघ गटनेते नगरपालिका,नितीन तावडे विधानसभा क्षेत्र प्रमुख,खालील देशमुख, जिल्हा प्रवक्ता,विकास पाटील सर तालुका अध्यक्ष पाचोरा,संतोष जाधव तालुका अध्यक्ष भडगाव,अजहर खान शहराध्यक्ष पाचोरा,शाम भोसले शहराध्यक्ष भडगाव,हर्षल पाटील कार्याध्यक्ष भडगाव ,विजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष,सुदर्शन सोनवणे  युवक शहराध्यक्ष,शालिग्राम मालकर प्रदेश कार्यकारणी सदस्य,सतीश नारायण चौधरी सदस्य,एडवोकेट अविनाश सुतार लीगल सेल अध्यक्ष,स्वप्निल अमृत पाटील युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव ,स्वदेश पाटील युवक राष्ट्रवादी काँग्रेस भडगाव,ललित राजेंद्र वाघ पंचायत समिती सदस्य,विनोद भिकन तावरे सरपंच नांद्रा

प्रकाश एकनाथ पाटील वाडी,सुदाम वसंत वाघ  खडकदवळा,डॉ. अमृत विनायक पाटील ओबीसी तालुकाध्यक्ष,बशीर बागवान नगरसेवक अशोक शंकर मोरे नगरसेवक,रामधन बद्रीनाथ परदेशी,उमेश संजय एरंडे  युवक जिल्हा संघटक,अभिजित सिद्धार्थ पवार युवक तालुकाध्यक्ष,सचिन संजय शिंदे जिल्हा सचिव,पंकज गढरी जिल्हा उपाध्यक्ष,गौरव पाटील ,जिल्हा सरचिटणीस ज्योती संजय वाघ, महिला पदाधिकारीअभिलाशा रोकडे युवती तालुका अध्यक्ष पाचोरा,स्नेहा नाना गायकवाड जिल्हा परिषद सदस्य ,दक्षता विठ्ठल पाटील तालुका अध्यक्ष युवती भडगाव,योजना दत्तात्रय पाटील नगरसेविका भडगाव ,रेखा सुरेश पाटील तालुका अध्यक्ष महिला भडगाव,हर्षा विठ्ठल पाटील शहराध्यक्ष महिला भडगाव ,दक्षता पाटील ,ज्योती संजय वाघ,रेखा राजेंद्र देवरे तालुका अध्यक्ष महिला पाचोरा,सुवर्णा राजेंद्र शिंदे महिला सदस्य पाचोरा सरला ताई राजेंद्र पाटील,सुनिता मंगेश देवरे, शहर अध्यक्ष महिला पाचोरा,डॉ.शेख शिवाजीराव पाटील ,प्रदीप पाटील ,परेश पाटील हरून देशमुख,बशीर बागवान,अरुण शालिक पाटील,भगवान मिस्तरी,सत्तार पिंजारी,रजू बागवान,तारीख शेख,बशीर बागवान नगरसेवक अजय भास्कर आहिरे,निलेश राजेंद्र पाटील,तेजस ज्ञानेश्वर पाटील,बंटी मगर,दिलावर तडवी,गुलाब तडवी ,जमीर तडवी,विलास सोनवणे विलास राजेंद्र पाटील,अशोक सोनवणे यांचे सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\