पाचोऱ्यातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये पारितोषिकांचा वर्षाव

पाचोरा दि 5- दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी सीनियर केजीच्या अवघ्या पाच वर्षाच्या कु.हर्षिका दिपक पटवारी या चिमूरडीने इंटरनॅशनल ऑलिंपियाड २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर अबॅकस या इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीवरील घेण्यात येणाऱ्या परीक्षेत हिने सुवर्णपदक आणि मानचिन्ह ही जिंकले .खरंतर या इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेत १८ देशांमधून विद्यार्थी यात सहभागी होतात. आणि उत्तीर्ण विजेत्यांना प्रमाणपत्र हे तैवान या देशामधून दिले जाते. अशा या गुणवान विद्यार्थिनीचा गुणगौरव शाळेचे प्राचार्य मा. प्रेमकुमार शामनाणी सर यांनी मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन केला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे शिक्षक आणि पालक यांचाही सत्कार मा.प्राचार्य यांनी यावेळी केला व त्यांचे कौतुकही केले.
बातमी लाईक करा शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS,मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



