राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर यांच्या वतीने कळमसरा येथील लैंगिक शोषण झालेल्या पीडितेवर झालेल्या अत्याचाराची सखोल चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई होणेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना दिले निवेदन.
मौजे कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील मागासवर्गीय गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणांनी लैंगिक शोषण करून सामूहिक अत्याचार झालेला असून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे. या बाबीचा महाराष्ट्रातील चर्मकार समाज निषेध करीत आहे. सदर प्रकरण महोदयांनी सखोल चौकशी करून कोर्टातील कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी. सदर चे केस फास्ट कोर्ट द्वारे चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व पीडित गरीब मागास कुटुंबास न्याय मिळावा या मुळे मागासवर्गीय होणारे अत्याचार विषयी प्रश्न म्हणून गुन्हेगारीला आळा बसेल या आशयाचे निवेदन पिंपळगाव पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांना देण्यात आले. माहितीस्तव निवेदन प्रत माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय पालकमंत्री यांना पाठवण्यात आले आहेत. यावेळीडॉ.जितेंद्र वानखेडे तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर , अशोक भारुडे अध्यक्ष संत रोहिदास प्रतिष्ठान , रामचंद्र दादा वानखेडे दिपक सुरळकर , संजय उंबरकर, पदमे साहेब, अॕड सुरळकर,जामनेर तालुका चर्मकार समाज, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जामनेर पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377