गो.से. हायस्कूल पाचोरा, येथील उपशिक्षक बापू शिवाजी पाटील (गाळण) सेट परीक्षा उत्तीर्ण
श्री गो.से. हायस्कूल पाचोरा, येथील उपशिक्षक बापू शिवाजी पाटील (गाळण) यांनी सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठाची सेट परीक्षा हिंदी विषयातून उत्तीर्ण केली असून परिसरातून त्यांचें अभिनंदन केले जात आहे.
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल .पाचोरा. येथील उपशिक्षक बी. एस .पाटील. सर. यांनी सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा हिंदी विषयातून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .
यापूर्वी ते एम. ए .मराठी, एम. ए .हिंदी, एम. ए. इतिहास, एम. एड्.या विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून “वासंतिक संस्कृत शिक्षक प्रशिक्षण”सलग तीन वर्ष यशस्वी पूर्ण केले असून, त्या ठिकाणी पहिल्या दोन वर्षात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव ची 2019 ची पेट परीक्षाही ते उत्तीर्ण असून सध्या त्यांचे संशोधनाचे कार्य सुरू आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ .संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ .व्हाईस चेअरमन व्हीं .टी. जोशी . मानस सचिव महेश देशमुख. शालेय समिती चेअरमन खलील देशमुख. तांत्रिक प्रमुख वासुदेव महाजन. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ. उपमुख्याध्यापक एन .आर. पाटील. पर्यवेक्षक आर. एल. पाटील. ए. बी.आहीरे. सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377