आ.किशोर पाटील यांच्यावर विश्वास दाखवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जम्बो प्रवेश; राष्ट्रवादीला पुन्हा ‘दे’ धक्का
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील उपसरपंच संतोष परदेशी यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष व ७ ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.यावेळी सुमारे ६० जणांनी पक्ष प्रवेश केला असून आगामी निवडणुकात आमदार किशोर पाटील यांना आपण भक्कम साथ देणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.केवळ गाव विकासासाठी राजकारण हाच उद्देश आपण समोर ठेवला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असून आम्ही देखील गाव समृद्धी साठी प्रयत्नरत असून त्यासाठीच विकासाची कास धरलेल्या आमदार किशोर पाटील यांचे हाथ आम्ही बळकट करत असल्याची भावना उपसरपंच संतोष परदेशी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच शांतीलाल परदेशी पैलवान ईश्वर परदेशी तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतिष परदेशी भगवान परदेशी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे रणजीत परदेशी विपुल परदेशी मोहन परदेशी गोकुळ परदेशी रवींद्र परदेशी सोनू परदेशी, बापूराव परदेशी अविनाश मोची किशोर मोची गोपाल मोची ज्ञानेश्वर मोची गोकुळ मोची गौतम जाधव राजू धनवान कैलास मोची जीवन मोची रोहित मोची मनोज परदेशी आदींचा समावेश आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377