तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन
जळगाव,दि.16:-जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन घेण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार, 20 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेवून तालुकास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमात आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377