पाचोरा– निंबायती येथील रहिवासी अजामल जय सिंग राठोड यांचा अवघ्या दोन वर्षांचा बाळ लकी राठोड तब्बल दहा दिवसा पासुन आजारी होता तब्बेत सुधारण्या ऐवजी अधिकच खालावत चालली होती अखेर बाळाच्या माता-पित्यांनी पाचोरा शहर गाठले आणि सिद्धीविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल मध्ये डॉ ग्रीष्मा पाटील यांच्याकडे दाखल केले
तपासणी अंती फुप्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती फुप्फुसांमध्ये न्यूमोनिया सोबतच ऑक्सिजनची पातळी कमी यामुळे बालकाची खालावत होती अशा परिस्थितीत सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या बालरोग तज्ञ डॉ ग्रीष्मा पाटील यांनी खंबीर भूमिका घेत बाळाच्या नातेवाईकांना धिर देत मृत्यूशी झुंज देणाऱ्या बालकावर तातडीने उपचार सुरू केला परिणामतः तब्बल 12 व्या दिवशी बाळ लकी राठोड नावाप्रमाणे लकी ठरला आणि त्याने अखेर मृत्यूवर विजय प्राप्त केला अर्थात यासाठी देवदुता प्रमाणे संभाव्य परिस्थिती व परिणाम याचा विचार करून ज्यांनी प्रयत्न केले त्या डॉ. ग्रीष्मा स्वप्नील पाटील व त्यांच्या हॉस्पिटल स्टाफ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आपलं बाळ सुखरूप घरी परतत असतांना त्या मातेच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. विशेष म्हणजे स्वतंत्र मायक्रोफायनान्स या बचत गटाचा केअर हेल्थचा ( मेडी क्लेम ) असल्याने या मुलाचा संपुर्ण उपचार स्वतंत्र मायक्रोफायनान्स ची कॅशलेस सुविधा असलेल्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे निशुल्क झाल्याने बचत गटाला देखील मेडीक्लेम & कॅशलेस सुविधेचे महत्व कळून आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377