आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रांत अधिकारी यांना निवेदन


पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा भडगाव तालुक्यातर्फे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी प्रांत अधिकारी यांना सह्यांचे निवेदन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ ,पि.टी.सी. चेअरमन संजय नाना वाघ, सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, नितीनदादा तावडे,विकास पाटील, रणजीत पाटील, अझहर खान,राहुल दादा पाटील,हर्षल पाटील,कुणाल पाटील,भूषण सोनवणे, नीमन दादा,संजय परदेशी, मोठाभाऊ पाटील,सुदर्शन सोनवणे, शालीग्राम मालकर,ललित वाघ,भूषण वाघ,विजू आप्पा पाटील, व्हीं एस पाटील सर,शशिकांत वाघ,वासुदेव माळी,अशोक मोरे,डी डी पाटील सर,एन सी तात्या पाटील,प्रकाश बापू पाटील,बी एम पाटील,दीपक पाटील,योगेश पाटील, ए जे महाजन सर, ए बी अहिरे सर,अविनाश सुतार,विनोद पाटील,रघुनाथ पाटील,रवी झवर,सतीश चौधरी,भगवान मिस्तरी,शिवाजी पाटील,भैय्या पाटील, दिगंबर पाटील,अनिल पाटील,किशोर पाटील,आबा पाटील,महेंद्र पाटील,सुरेश पाटील, सत्तार भाई पिंजारी, सय्यद भाई तारीख,सुनील पाटील सर,जमील तडवी,हिरामण काळे,शिवदास तात्या पाटील,कोळी सर,अशोक पाटील,प्रदीप पाटील,संतोष कुटे,सागर अहिरे,हमीद शाह, हारून देशमुख,सचिन पाटील,रवींद्र पाटील, बुरहान तडवी,अनिल वाघ,धर्मा आण्णा,बारकु दादा,श्याम परदेशी,प्रकाश भोसले,राजेंद्र पाटील,संतोष पाटील,सतीश देशमुख,बाबाजी ठाकरे,जनार्दन पाटील,अशोक पाटील,सुनील विठ्ठल पाटील,प्रकाश नाना निकुंभ,गुलाब तडवी,जय सुतार,निलेश पाटील,हरीश पाटील,गौरव शिरसाठ,यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यातआले. यापूर्वीही दोन महिन्यापूर्वी पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.पावसाळ्यामध्ये पाऊस उशिरा सुरू झाला होता ,समाधानकारक नव्हता शिवाय पाऊस वेळेवर न पडल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षाप्रमाणे शेतीपासून उत्पादन मिळालेले नाही किंबहुना बऱ्याच ठिकाणी पेरणी व इतर उपाययोजना केलेला खर्च अद्याप पर्यंत आलेला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे , जिल्ह्यातील तीन मंत्री सत्तेत असताना देखील राजकीय नेत्यांच्या अभावामुळे शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये आपल्या तालुक्यांचा समावेश केलेला नाही. निवेदनावर पाचोरा भडगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सह्या होत्या. आर्थिक आणेवारी,दुष्काळाची तीव्रता, पिक विमा योजना, समाधानकारक नुकसान भरपाई मिळावी, इत्यादी ज्वलंत प्रश्न व पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तरी शासनातर्फे लवकरात लवकर दुष्काळग्रस्त यादीमध्ये दोन्ही तालुके समाविष्ट न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी वजा आवाहन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या रॅलीने पाचोरा शहराचे लक्ष वेधले घोषणांनी पाचोरा शहर दणाणून गेले दोन्ही तालुके दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी शेतकरी जोरजोराने बोलून दाखवत होते

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\