आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन


पाचोरा- दिनांक, 1मार्च 2024 रोजी पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इ.3 री ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एकूण ३८८ प्रकल्प बनवून इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून माहिती सादर करून भेट देणाऱ्या पालक वर्गाला मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा पंचायत समितीचे माननीय गट शिक्षणाधिकारी श्री समाधान पाटील यांनी दीपप्रज्वलन, फित कापून व रॉकेटच्या प्रतिकृतीचे संचालन करून केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मुलांना आधुनिक युगात विज्ञानाचे महत्व सांगून शास्त्रीय दृष्टिकोन वृंधिगत होण्यास शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले विज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री राजेन्द्र चिंचोले सर यांनी विद्यार्थ्याना विज्ञानावर आधारित विविध प्रश्न विचारून पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तसेच श्री हरी भाऊ पाटील व डॉ. मनिष दादा चंदनाणी यांनी लहान वयातच मुलांची प्रगती पाहून विद्यार्थ्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सौ. सुरेखा दिलीप जैन यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना अलाहित व विज्ञान विषयाचे ज्येष्ठ शिक्षिका सौ. डॉ. अमेना बोहरा यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर यांनी केले .
अनेक पालकांनी विद्यार्थ्यासोबत सेल्फी काढून व आपले लेखी अभिप्राय देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकलीत.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\