पाचोरा – युवासेना बांधणी ,शहरात युवासेना विस्तार करण्याहेतूने सदर बैठकीचे आयोजन केले होते .युवानेते सुमित दादा पाटील ,जिल्हाप्रमुख जितेंद्र दादा जैन,सरचिटणीस मयूर भाऊ महाजन ,तालुकाध्यक्ष अनिलभाऊ पाटील ,शहरप्रमुख गणेश अण्णा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर मिटिंग सम्पन्न झाली .युवासेनेची शहर,प्रभाग निहाय कार्यकारिणी तसेच पुढील वाटचाल यावर जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन व तालुकाप्रमुख अनिल पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख समीर शेख यांनी अप्पांच्या अल्पसंख्यांकांसाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मत व्यक्त केले ,विविध प्रभागातील युवासैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी शहरात युवासेना आणखी मजबूत करण्याचा निर्धार सर्वांनी केला .यावेळी सर्व प्रभागातील युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मिटिंग चे सूत्रसंचालन शुभम बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377