आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

सौ.वैशाली ताई सुर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त पाचोरा-भडगाव तालुक्यात शिवसेना (उबाठा) पक्ष संघटनेच्या मजबुतीकरण व विस्तारीकरणासाठी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाचा संकल्प

पाचोरा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, निर्मल ग्रुपच्या प्रमुख सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पाचोरा व भडगाव तालुक्यात साजरा झाला. गावागावात कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला. सर्व शिवसैनिकांनी वाढदिवसाला शूभेच्छा दिल्यात. शहरामध्ये चौका चौकात त्यांच्या वाढदिवसाला आशिर्वाद देण्यासाठी शुभेच्छुक उपस्थित होते. सर्व बांधवांचे त्यांनी आभार मानले आहेत.

त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा वाढदिवस हा इतर वाढदिवसांपेक्षा विशेष आहे.इतर वेळी सामाजिक व औद्योगिक क्षेत्राशी निगडित म्हणून आपण सर्व मला आशीर्वाद देत आलेला आहात.मात्र यावेळी आपण सामाजिक, औद्योगिक व ‘राजकीय’ व्यक्ती म्हणून मला आशीर्वाद दिले याचा आनंद आहे.गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या व पाचोरा भडगावच्या राजकारणात काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे.शिवसेना या विचारला सुरुंग लावून नवे किल्ले बांधण्याची काहींनी केलेले तयारी आपल्याला माहितीच आहे.नव्या सुभेदारासोबत आपलं घर सोडून सोबत करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा तुम्हाला, मला कोणालाच आवडली नाही.त्यामुळे अगदी अनपेक्षित पणे मी राजकारणात पाचोरा भडगावच्या विकासासाठी उतरली.
यापुढील काळात आपल्या भेटी वारंवार होतील. तात्यांची मुलगी म्हणून आपण मला आशीर्वाद तर द्यालच पण पाचोरा भडगावच्या विकासासाठी यापुढे साथ द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करते, असे सांगितले.

सौ वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेच्या मजबुतीकरण व विस्तारीकरणासाठी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाची सुरुवात करणार असल्याचा संकल्प केलेला आहे.

गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता’ या अभियानाची सर्व स्तरावर उत्सुकता दिसून येत आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!