श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श महिला पोलीस पाटील पुरस्कार देऊन सन्मानित
पाचोरा: नुकतेच ०१ ऑगस्ट रोजी महसूल दिनी कृष्णापुरी-पाचोरा शहर भागातील पोलीस पाटील श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांना आदर्श महिला पोलीस पाटील म्हणून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले याप्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत श्रीयुत राजेंद्र कचरे साहेब,पुरवठा अधिकारी श्रीयुत आंधळे रावसाहेब,प्रांत ऑफिस मधील वरिष्ठ सहायक श्रीयुत कोळी रावसाहेब तसेच आमदार श्रीयुत आप्पासो किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्रीयुत राजू पाटील तसेच वीज वितरण कँपनी चे माजी वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीयुत प्रकाश बेंडाळे सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत अनिल सावंत सर,इत्यादी उपस्थित होते
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत या हा पुरस्कार पटकविणाऱ्या पाचोरा तालुक्यातील पहिल्या महिला पोलीस पाटील आहेत हे विशेष तसेच कृष्णापुरी भागातील देखील पहिल्या महिला पोलीस पाटील म्हणून त्यांनी बहुमान पटकाविला आहे हे विशेष
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत ह्या सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल सावंत यांच्या धर्मपत्नी असून त्यांचे विवीध क्षेत्रात कार्य उल्लेखनीय असून त्यांच्याच कामाची तसेच दोघी पती पत्नी यांची केलेल्या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला असून त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत
.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका वतीने आदर्श पोलीस पाटील श्रीमती भारती बेंडाळे-सावंत यांचा सत्कार
दिनांक ०४ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर च्या वतीने नुकतेच आदर्श महिला पोलीस पाटील,श्रीमती भारती बेंडाळे-सावंत,कृष्णापुरी-पाचोरा शहर यांचा सत्कार एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला याप्रसंगी कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री बी बी मोरे आप्पा,कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष अण्णासाहेब प्रकाश रोझतकर,तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे,तालुका सचिव श्री उमेश सोनवणे,तसेच गाळण बु सरपंच श्री राजेन्द्र सावंत,चि जयेश सावंत उपस्थित होते यावेळेस जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेष्ठ नेते श्री अनिल सावंत सर यांची कन्या कु गायत्री सावंत हिस ८७:५०% मिळाल्याबद्दल तिचे देखील अभिनंदन व कौतुक करण्यात आले
.
श्रीमती भारती बेंडाळे-सावंत या सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे जेष्ठ नेते यांच्या पत्नी असून कु गायत्री सावंत ह्या त्यांच्या कन्या आहेत
.
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377