आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
राजकीय
Trending

मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना लोकप्रतिनिधींसह,पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेश.

पाचोरा – येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी पराभूत झाल्यानंतर मा.मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जोमाने व मोठ्या उमेदीने मतदारसंघात लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या थेट संपर्कात राहत आहेत.त्यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीला घरा-घरापर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे.आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने भाजपा मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी मधून मोठे चेहरे प्रवेश करणार असल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू असताना,शिवसेनेचे एकेकाळी निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या पंचायत समितील २०१६ च्या निवडणुकीत एकमात्र निवडून आलेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य व निष्ठावान व कट्टर शिवसैनिक ज्ञानेश्वर सोनार यांनी वरखेडी,सावखेडा,लासुरे,कुऱ्हाड आणि आंबेवडगांव परिसरातील गावांमधून असंख्य पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत मा.मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
तसेच आमदार किशोर पाटील हे तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत. माझ्यासारखे अजून असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्याठिकाणी घुसमट होत असून लवकरच तालुक्यातील शिवसेनेला मोठे भगदाड पडणार असल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केले आहे.त्यामुळे कधी काळी पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या शिवसेनेला पंचायत समिती सभागृहात एकही सदस्य नसल्याने प्रवेश देखील करता येणार नाही.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री जिल्ह्यात पालकमंत्री व तालुक्यात आमदार व तेही सत्ताधारी पक्षाचे असून देखील पंचायत समिती मध्ये ‘शिवसेनेला भोपळा’ अशी उपरोधात्मक टीका अमोल शिंदे यांनी केली आहे.तसेच लवकरच मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात भव्य असा प्रवेश सोहळा होणार असून पाचोरा,भडगाव शहरासह तालुक्यातील असंख्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते यावेळी भाजपात प्रवेश करणार असल्याचे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले, याप्रसंगी जि प सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,मा.सभापती बन्सीलाल पाटील,तालुका सरचिटणीस संजय पाटील,प्रदीप पाटील,संजय शांताराम पाटील,परेश पाटील,जगदीश तेली,किरण पाटील,राजू राठोड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!