आ.किशोरअप्पा पाटील यांचे तर्फे मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार सोहळा संपन्न
मुंबई दि.17- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यकर्ता मेळावा तसेच सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.
सत्कार स्वीकारताना उपस्थितीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना कोणत्या परिस्थितीत माझ्यासह ५० आमदारांनी उठाव करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला ते विषद करित कोणत्याही पदाची लालसा बाळगून हा निर्णय घेतला नसल्याचे देखील याप्रसंगी स्पष्ट केले.
माझ्यासोबत आलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करू असे आश्वासन यासमयी देत समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करेल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अब्दुल सत्तार, आमदार शहाजीबापू पाटील, पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व मा नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377
.
.
.
.
.
.
.
.
Cour’sy.cm.twtr