पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर
पाचोरा,दि 28 – पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानूसार दिनांक 28/07/2022 रोजी दुपारी 3-00 वाजता नगरपरिषद सभागृह येथे आयोजीत करण्यात आलेला होता. त्यानूसार एकूण 14 प्रभागांमधून 28 सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. त्याअन्वये दिनांक 13/06/2022 रोजी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जाती (महिला), अनुसुचीत जमाती, अनुसुचीत जमाती (महिला) करीताचे आरक्षण निश्चीत करण्यात आलेले होते. आज रोजी नागरीकांचा मागासप्रवर्ग, नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला), महिला व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता खालील प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रभाग क्रं. 1 अ) अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रं.1 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.2 अ) अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रं.2 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.3 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रं.3 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.4 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रं.4 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.5 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रं.5 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.6 अ) अनुसूचित जमाती
प्रभाग क्रं.6 ब) सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रं.7 अ) अनुसूचित जाती
प्रभाग क्रं.7 ब) सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रं.8 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग
प्रभाग क्रं.8 ब) सर्वसाधारण ( महिला )
प्रभाग क्रं.9 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रं.9 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.10 अ) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रं.10 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.11 अ) सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रं.11 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.12 अ) सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रं.12 ब) सर्वसाधारण
प्रभाग क्रं.13 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग
प्रभाग क्रं.13 ब) सर्वसाधारण ( महिला )
प्रभाग क्रं.14 अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग
प्रभाग क्रं.14 ब) सर्वसाधारण ( महिला )
सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दिनांक 29/7/2022 ते 01/08/2022 पावेतो मागविण्याचा कालावधी आहे.
सदर बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. सदर आरक्षण सोडतीकरीता गो.से.हायस्कूल कडून आलेले शिक्षक महेश कौंडिण्य यांच्या समवेत असलेले विद्यार्थी चि. भार्गव राजेंद्र मानकरे व कु.वैष्णवी गोपाल पवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली. सदर प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. यावेळी तहसिलदार श्री.कैलास चावडे, पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती.शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी श्री.दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी श्री.प्रकाश भोसले, संगणक अभियंता, मंगेश माने, विधी अधिकारी भारती निकुंभ, लिपीक विशाल दिक्षीत, लिपीक ललित सोनार, किशोर मराठे तसेच अधिकारी कर्मचारी व शहरातील विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.