आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोर्यात विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली

पाचोरा : ऐन दिवाळीत विज वितरण कंपनीने  पाचोरा, भडगाव, पारोळा तालुक्यातील विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम सुरू असुन ती थांबवण्यासाठी पाचोरा काॅग्रेस विभागिय कार्यालयात धडकली

पाचोरा, भडगाव, पारोळा शहर व तालुक्यातील विज वितरण कंपनीने ऐन दिवाळीत थकीत बिल वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून यात अनेकांचे विज खंडीत करीत आहेत अशातच शेतकरी वैतागले आहेत. घरगुती कनेक्शन कट झाल्याने दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठीच पाचोरा काॅग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली विज वितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांची भेट घेऊन कॉंग्रेस पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,  शेख इस्माईल शेख फकीरा, महिला तालुका अध्यक्ष अॅड. मनिषा पवार, जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, आरोग्य सेवा सेल जिल्हा सचिव डॉ. अनिरुद्ध साळवे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, समाधान ढाकरे, यश साळुंखे, रवी पाथरवट आदींनी कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी कॉंग्रेस पदाधिकारी यांना आश्वासित केले की कोणत्याही शेतकर्‍यांचे, पाणी पुरवठा योजना, स्ट्रिट लाईट यांचे कनेक्शन कट होणार नाही तर घरगुती  आणि व्यापारींचे थकीत बिले परीस्थिती नुसार येत्या दोन दिवसांत वसुली करु तर दिवाळी चे तिन दिवस मानवता दृष्टि ने कोणाचेही कनेक्शन कट होणार नाही असे सांगितले. कॉंग्रेस चे निवेदन तात्काळ वरीष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचेही शेवटी श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!